Surabhi Jayashree Jagdish
देवाची पूजा करताना मन आणि मेंदू एकाग्र ठेवणे अत्यंत गरजेचे असते.
पूजेच्या दरम्यान मनात वासना, चुकीचे किंवा नकारात्मक विचार येत असतील, तर त्यापासून वाचण्यासाठी एक सोपा उपाय आहे.
पूजा करण्यापूर्वी दोन्ही हात व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावेत. यानंतर तीन वेळा गंगाजलाच्या थेंबांचे ग्रहण करावे.
दिवा लावून झाल्यानंतर हातात पिवळी मोहरी घेऊन "ॐ श्री कालभैरवाय नमः" या मंत्राचा जप करावा.
यानंतर पिवळी मोहरी आपल्या अंगावरून तीन वेळा फिरवावी. यानंतर मनात भगवंताचे ध्यान करत प्रार्थना करावी.
प्रार्थना करताना असे म्हणावे की, "माझ्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक ऊर्जेतून मला मुक्त करा."
प्रार्थनेनंतर ती पिवळी मोहरी कपूरासह जाळून टाकावी.