PCOD: पीसीओडी असल्यास करा 'हे' सोपे उपाय, काही दिवसातच दिसेल फरक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पीसीओडी पासून आराम कसा मिळवायचा?

पीसीओडी ही महिलांमध्ये होणारी एक सामान्य हार्मोनल असंतुलन आहे. यावर आराम मिळवण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

pcod | yandex

निरोगी आहार घ्या

पीसीओडीमध्ये आहाराची भूमिका महत्त्वाची असते. आहारात फायबर, हिरव्या भाज्या, फळे, धान्य आणि प्रोटीनचा जास्त प्रमाणात समावेश करा. तळलेले पदार्थ आणि साखरेचे सेवन मर्यादित करा.

PCOD | Saam Tv

तुमचे वजन नियंत्रणात ठेवा

जास्त वजनामुळे PCOS वाढू शकते. हळूहळू वजन कमी केल्याने हार्मोनल संतुलन सुधारू शकते आणि मासिक पाळी नियमित होऊ शकते.

pcod | YANDEX

नियमित व्यायाम करा

दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम किंवा चालणे खूप फायदेशीर आहे. योगासने, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओमुळे पीसीओएसशी संबंधित हार्मोनल असंतुलन सुधारण्यास मदत होऊ शकते.

PCOD | yandex

ताण कमी करा

ताणतणावामुळे हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात आणि PCOS वाढवू शकतो. ध्यान, प्राणायाम, डिप ब्रिदिंग आणि पुरेशी झोप घेणे यामुळे ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

pcod | freepik

पुरेशी झोप घ्या

दररोज ७ ते ८ तासांची झोप घेतल्यास हाार्मोन्स आणि मेटबॉलिजम नियंत्रणात राहण्यात मदत होते. झोपेच्या अभावामुळे इन्सुलिन रेझिस्टेंस वाढते.

PCOD | canva

हर्बल सप्लीमेंट्स

हर्बल सप्लीमंट्स जसे की, इनोसिटोल, क्रोमियम आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड पीसीओडीसाठी फायदेशीर मानले जाते. परंतु, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे किंवा सप्लीमेंट्स घेऊ नका.

PCOD | saam tv

NEXT: रक्षाबंधन आणि भाऊबीजमध्ये काय फरक आहे?

festival | yandex
येथे क्लिक करा