Surabhi Jayashree Jagdish
जर तुम्ही रोज उशिरा रात्री जेवत असाल तर सावध होण्याची गरज आहे. ही सवय अनेकांना नकळत लागलेली असते. पण तिचे परिणाम हळूहळू दिसू लागतात.
उशिरा जेवण्यामुळे शरीरावर ताण येतो. ही सवय शरीराला आतून कमकुवत बनवते.
याचा पचनशक्तीवर परिणाम होतो.
आपलं शरीर एका नैसर्गिक बायोलॉजीकल क्लॉकप्रमाणे काम करतं. यालाच सर्केडियन रिदम असं म्हटलं जातं. हे झोप, पचन आणि हार्मोन्स नियंत्रित करते.
सूर्यास्तानंतर पचनसंस्था हळूहळू मंद काम करू लागते. या वेळेनंतर जड अन्न पचायला कठीण जातं. म्हणून रात्री उशिरा खाणं टाळावं.
उशिरा जेवल्याने झोप नीट लागत नाही. अशावेळी झोपण्यापूर्वी तिखट आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यास अॅसिडिटी वाढते. छातीत जळजळ जाणवू शकते.
उशिरा खाण्याचा परिणाम रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो. रात्री इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे शुगर नियंत्रण बिघडू शकतं.
रात्री शरीर कमी कॅलरी बर्न करतं. यावेळी उरलेली ऊर्जा चरबीच्या स्वरूपात साठू लागते. म्हणून रात्रीचे जेवण ७:३० ते ८ वाजेपर्यंत पूर्ण करावं.