Monsoon trekking: पहिल्यांदा ट्रेकिंगला जात असाल तर हे ५ किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

Surabhi Jayashree Jagdish

पावसाळा

पावसाळ्यात गड-किल्ल्यांचा अनुभव खूपच वेगळा असतो. हिरवीगार निसर्गरम्य दरी, धुक्याने झाकलेले डोंगर आणि वाहणारे धबधबे यामुळे ट्रेक अधिक रोमांचक होतो.saam tv

easy treks near Mumbai | saam tv

सोपे ट्रेक

मुंबई आणि पुण्याजवळ अनेक सोपे किल्ले आहेत जिथे नवखे ट्रेकर्स देखील आरामात ट्रेक करू शकतात.

योग्य काळजी घेतली तर पावसाळ्यातील ट्रेकिंग हा आयुष्यातला सुंदर अनुभव ठरतो. हे किल्ले कोणते आहेत ते पाहूयात.

fort trekking Maharashtra | saam tv

लोहगड किल्ला

लोहगड हा पावसाळ्यातील सर्वात सोपा आणि लोकप्रिय ट्रेक मानला जातो. पुणे आणि मुंबईहून इथे पोहोचणे खूप सोपे असल्यामुळे अनेक ट्रेकर्स याठिकाणी येतात. पावसात हा किल्ला हिरव्या गालिच्यासारखा दिसतो आणि ढगांमध्ये हरवलेला भासतो.

weekend treks Mumbai | saam tv

विसापूर किल्ला

विसापूर किल्ला लोहगडच्या जवळ असून ट्रेकिंगसाठी तुलनेने सोपा आहे. पावसाळ्यात याठिकाणी छोटे-छोटे धबधबे आणि धुक्याने भरलेला निसर्ग पाहायला मिळतो. या किल्ल्यावर चढताना निसर्गाचा खरा आनंद अनुभवता येतो.

nature trails Maharashtra | saam tv

तिकोना किल्ला

तिकोना किल्ला त्रिकोणी आकारामुळे खूप प्रसिद्ध आहे आणि ट्रेकिंगसाठी सोपा आहे. पावसाळ्यात हा किल्ला पूर्णपणे हिरव्या रंगात न्हाऊन निघतो. वरून पवना तलावाचे दृश्य खूप सुंदर दिसते आणि मन प्रसन्न होते.

waterfall trekking spots | saam tv

कोरिगड किल्ला

कोरिगड किल्ला हा कमी उंचीचा आणि नवीन लोकांसाठी योग्य ट्रेक आहे. पावसाळ्यात याठिकाणी मोठ्या प्रमाणात धुके आणि थंड वारा अनुभवायला मिळतो. किल्ल्यावर पोहोचल्यावर संपूर्ण परिसराचं सुंदर दृश्य दिसतं.

green landscape treks | saam tv

राजमाची किल्ला

राजमाची किल्ला हा थोडा लांब ट्रेक असला तरी पावसाळ्यात खूप सुंदर दिसतो. याठिकाणी जंगल, धबधबे आणि हिरवाईचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. निसर्गप्रेमींसाठी हा ट्रेक एक अविस्मरणीय अनुभव देतो.

hill forts India | saam tv

Kolhapur Tourism: खरंच लोणावळा-खंडाळा विसराल; कोल्हापूरपासून फक्त २१ किमी लांब आहे हे हिल स्टेशन

Kolhapur Tourism | saam tv
येथे क्लिक करा