Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Surabhi Jayashree Jagdish

कावळ्याला अन्न का दिलं जातं

पितृ पक्षात कावळ्याला अन्न देण्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, कावळ्याला पितरांचं प्रतीक मानलं जातं. त्याचप्रमाणे कावळा हा यमराजाचा दूत असल्याचंही मानलं जातं.

Crow during Shraddha | saam tv

कावळ्याने अन्न खाल्ल्याचं महत्त्व

श्राद्धाच्या वेळी तयार केलेल्या अन्नाचा काही भाग कावळ्यासाठी वेगळा ठेवला जातो. कावळ्याने हे अन्न खाल्लं तर ते पूर्वजांपर्यंत पोहोचतं आणि त्यांना समाधान मिळतं अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्राद्ध करणारे कुटुंबीय कावळ्यासाठी आवर्जून अन्न ठेवतात.

Shraddha crow meaning | saam tv

कावळा आला नाही तर काय करावं?

शहरांमध्ये अनेकदा कावळे दिसत नाहीत किंवा अन्न ठेवूनही ते खाण्यासाठी येत नाहीत. अशा वेळी घाबरण्याची किंवा श्राद्धाचा विधी चुकीचा झाला असं समजण्याची गरज नाही. धार्मिक मान्यतेनुसार, कावळ्यासाठी ठेवलेलं अन्न इतर जीवांना श्रद्धेने खाऊ घालता येते.

Pitru Paksha rituals | saam tv

गायीसाठी अन्न द्या

कावळा दिसला नाही तर त्याच्यासाठी ठेवलेलं अन्न गायीला खाऊ घालता येते. श्राद्धातील अन्नाचा काही भाग गायीला देणं शुभ आणि चांगलं मानलं जातं. त्यामुळे गायीला श्रद्धेने अन्न अर्पण करणं हा एक पर्याय आहे.

Crow in Hindu tradition | saam tv

इतर जीवांनाही अन्न द्या

कावळा दिसत नसल्यास अन्नाचा काही भाग कुत्र्यासाठी ठेवता येतो. मुंग्या आणि इतर पक्ष्यांनाही हे अन्न श्रद्धेने देता येतं. पंचबलीच्या परंपरेत विविध जीवांना अन्न देण्याला महत्त्व दिलं जातं.

Crow and ancestors | saam tv

कावळ्याचा संबंध ग्रहांशीही जोडला जातो

ज्योतिषशास्त्रातील काही मान्यतांमध्ये कावळ्याचा संबंध शनि, राहू आणि केतू या ग्रहांशी जोडला जातो. त्यामुळे कावळ्याला अन्न देणं शुभ मानलं जातं. कावळ्याला अन्न दिल्याने पितृदोष आणि ग्रहांशी संबंधित अडचणी कमी होतात अशीही धार्मिक श्रद्धा आहे.

Shraddha religious beliefs | saam tv

CNG bike: CNG बाईकची रेंज किती? 2 किलो CNGमध्ये जाणून घ्या किती किमी धावते?

CNG bike | saam tv
येथे क्लिक करा