Toxic friendship: मैत्रीत लपलेला वैरी ओळखा, ‘टॉक्सिक फ्रेंडशिप’ची ही 6 धोकादायक लक्षणं

Surabhi Jayashree Jagdish

टॉक्सिक फ्रेंडशिप

मैत्री हे आयुष्यातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक मानलं जातं. सुख-दुःखात साथ देणारी मैत्री प्रत्येकाला हवी असते. मात्र काही वेळा हीच मैत्री नकळत मानसिक ताणाचं कारण बनू शकते. प्रसिद्ध क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि बेस्टसेलर लेखिका डॉ. ज्युली स्मिथ यांनी अशाच ‘टॉक्सिक फ्रेंडशिप’बाबत काही महत्त्वाचे संकेत सांगितले आहेत.

friendship red flags

अटींवर टिकणारी मैत्री

खरी मैत्री ही निस्वार्थ प्रेम, पाठिंबा आणि विश्वासावर टिकून असते. पण जर एखादा मित्र फक्त त्याला सोयीचं असेल तेव्हाच तुमच्यासोबत चांगलं वागत असेल, तर हा धोक्याचा इशारा असू शकतो.

समोरच्याची अपेक्षा

डॉ. स्मिथ यांच्या मते, काही लोकांना तुमचं यश, आत्मविश्वास किंवा प्रगती सहन होत नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्या समोर नेहमी कमीपणाची भावना ठेवावी, अशी त्यांची अपेक्षा असते. अशा नात्यात मोकळेपणाने जगणं कठीण होतं.

emotional manipulation friendship

‘नाही’चा आदर केला जात नाही

कोणत्याही नात्यात मर्यादा आणि पर्सनल स्पेस महत्त्वाची असते. मैत्रीतही हे तितकंच लागू होतं. जर तुमचा मित्र तुमच्या स्पष्ट ‘नाही’कडे दुर्लक्ष करत असेल आणि सतत स्वतःचं म्हणणं लादत असेल, तर ते नातं हेल्दी नाहीये.

unhealthy friendship

इमोशनल प्रेशर

अनेकदा असे लोक इमोशनल प्रेशर समोरच्या व्यक्तीवर टाकतात. दबाव टाकून किंवा अपराधी वाटेल असं बोलून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडतात. त्यामुळे जर तुमच्या नात्यात असं होत असेल तर सावध व्हा.

mental health relationships

कौतुकामागे असलेले टोमणे

काही वेळा मित्रांकडून मिळणारं कौतुकही मनाला टोचणारं वाटतं. वरून गोड बोललं जातं, पण त्या शब्दांमध्ये टोमणे किंवा कमी लेखण्याची भावना लपलेली असते. डॉ. स्मिथ यांच्या मते, हे टॉक्सिक मैत्रीचं एक मोठं लक्षण आहे.

friendship mental stress

भावना समजून न घेणं

जेव्हा तुम्ही एखादं दुःख किंवा अडचण मित्रासोबत शेअर करता, तेव्हा समोरचा तुमचं ऐकून घेण्याऐवजी स्वतःच्याच अनुभवांची तुलना करू लागतो, तेव्हा ते नातं टॉक्सिन होतं असं आपण म्हणू शकतो.

emotional pressure friends

Kolhapur Tourism: खरंच लोणावळा-खंडाळा विसराल; कोल्हापूरपासून फक्त २१ किमी लांब आहे हे हिल स्टेशन

येथे क्लिक करा