Shraddha Thik
कुटुंबासोबत देवदर्शनाचा प्लान करताय तर महाराष्ट्रातील या तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्या.
औरंगाबादमधील वेरूळ हे लेण्यांसोबत घृष्णेश्वर मंदिरासाठीही फेमस आहे.
रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे समुद्रकिनाऱ्या लगतच गणपतीचे मंदिर आहे. तेथील निसर्गरम्य वातावरण मनाला भूरळ पाडेल.
नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. हे मंदिर ब्रम्हगिरी पर्वतांवर आहे.
पुण्यातील खेड तालूक्यातील भोरगिरी येथे असलेले भीमाशंकर हे प्रसिद्ध मंदिर आहे. खेडपासून 50 किमी अंतरावर आहे.
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. येथे असलेले निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी फारच चांगली जागा आहे.
अंजनेरी पर्वतावर हनुमंताचे जन्मस्थळ आहे असे म्हणतात. त्यामुळे तेथे असलेले रम्य दृश्य त्यासोबत ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकतो.