Janmashtami 2022 : जगभरात कसा साजरा केला जातो कृष्णजन्मोत्सव?

कोमल दामुद्रे

श्रीकृष्णाचा जन्म भारताबाहेर सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Shri krishna | Canva

भारतात मथुरेत सर्वात मोठ्या प्रमाणात कृष्ण जन्म साजरा केला जातो. पौराणिक कथेप्रमाणे कृष्णाचा जन्म हा ह्याच ठिकाणी झाला होता.

Mathura | Saam Tv

सिंगापूरमधील लिट्ल इंडिया मधील चांदेर रोडवरील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात दरवर्षी खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लिट्ल इंडिया ते कलांग सगळीकडे हरे कृष्णा चा गजर आपल्याला ऐकू येतो.

Singapore | Saam Tv

कॅनडातील भारतीय निवासी टोरोंटोमधील रिचमॉन्ड टेकडीवरील मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कृष्ण जन्माष्टमी साजरी करतात.

Canada | Saam Tv

पाकिस्तानातील कराचीच्या श्री स्वामीनारायण मंदिरात भजन आणि सत्संगाच्या आयोजनाने दरवर्षी कृष्ण जन्म साजरा केला जातो.

Pakistan | Saam Tv

मलेशिया हा एक मुस्लिम बहुल देश असला तरी त्याठिकाणी खूप मोठ्या उत्साहात कृष्ण मंदिरात कृष्ण जयंती साजरी केली जाते.

Malaysia | Saam Tv

पॅरिस आणि फ्रांसच्या अनेक भागात घरोघरी आणि मंदिरात बरोबर रात्री बारा वाजता कृष्णाच्या मूर्तीला गंगाजलचा अभिषेक करून कृष्ण जयंती साजरी केली जाते. खास या कार्यक्रमासाठी गंगा जल फ्रांसमध्ये भारतातून मागवण्यात येतं.

France | Saam Tv

नेपाळच्या पाटण दरबार स्क्वेअरमधील सुप्रसिद्ध कृष्ण मंदिरात सर्व कृष्णभक्त फुलं, प्रसाद आणि नाणे कृष्णाला अर्पण करतात.

Nepal | Saam Tv

युकेत इस्कॉनचे मुख्य कार्यालय असून त्यांचे कार्य जगभरात प्रसिद्ध आहे. लंडनमध्ये २ दिवस मोठ्या उत्साहात हजारोच्या संख्येने लोकं एकत्र येत भक्तिवेदांता मनोर येथे कृष्ण जन्मोत्सव साजरा करतात.

Landon | Saam Tv

अमेरिकेतील न्यू यॉर्क, ऑर्लोन्डो, कॅलिफोर्निया अश्या अनेक शहरात मोठ्या भक्तिभावाने कृष्ण जयंतीचा उत्सव साजरा केला जातो.

America | Saam Tv

बांग्लादेशमध्ये कृष्णजन्माष्टमीला सरकारी सुट्टी दिली जाते. सर्व धार्मिक विधीसह त्यांच्या राजधानी ढाकामध्ये असलेल्या ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिरात हा उत्सव साजरा केला जातो.

Bangladesh | Saam Tv