Manasvi Choudhary
प्रत्येकाची डागविरहीत आणि चमकणारी त्वचा असावी अशी इच्छा असते. मात्र अनेकदा खाण्यापिणाच्या चुकीच्या सवयी, धूळ, पुरेशी झोप आणि हार्मोनल बदलामुळे चेहरा खराब होतो.
चेहरा उजळ होण्यासाठी तुम्ही महागड्या ट्रिटमेंटऐवजी गुलाबाच्या पाकळ्याचा वापर करू शकता. गुलाबाच्या पाकळ्याचे पाणी तुम्ही चेहऱ्याला लावू शकता.
गुलाबपाण्यात अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात यामुळे त्वचा निरोगी राहते. गुलाबाचे पाणी चेहऱ्याला लावल्याने त्वचेवरील काळे डाग कमी होतात आणि त्वचा उजळण्यास मदत होते.
उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेवर गुलाबपाणी लावल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेवर चमक येते.
सकाळी चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही क्लिन्झर म्हणून गुलाबपाणी वापरू शकता. कापसाच्या बोळ्याने किंवा स्प्रेच्या बाटलीतून गुलाबपाणी चेहऱ्याला लावा.
मेकअप काढण्यासाठी तुम्ही गुलाबपाण्याचा वापर करू शकता यामुळे चेहरा स्वच्छ होतो.
चेहऱ्यासाठी फेस मास्क बनवण्यासाठी गुलाबपाण्याचा वापर करा यामुळे त्वचेच्या सर्व समस्या कमी होतील.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबपाणी लावल्याने सकाळी उठल्यानंतर त्वचेवर नॅचरल ग्लो येतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. गुलाबपाण्याचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट करा तसेच अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.