Sakshi Sunil Jadhav
खूप गरमागरम चपाती डब्यात ठेऊ नका. थोडीशी गार झाल्यावरच डब्यात ठेवा.
डब्यात ठेवण्यापूर्वी सूती कापड किंवा टिश्यू पेपर टाका. यामुळे ओलावा शोषला जातो.
प्रत्येक चपाती हलक्या फॉइलमध्ये गुंडाळून ठेवा. त्यामुळे ती ओली होत नाही.
स्टील किंवा एअरटाइट डबा वापरा. प्लास्टिकच्या डब्यात उष्णतेमुळे जास्त ओलावा तयार होतो.
चपाती तयार झाल्यावर तिच्या वरती थोडंसं तूप किंवा तेल लावा. यामुळे ती मऊ राहते.
जास्त चपात्या एकावर एक ठेवल्या तर त्या चिकटतात. थोड्या अंतराने ठेवा.
डब्याच्या तळाशी टिश्यू पेपर किंवा कागद ठेवल्यास वाफ शोषली जाते.