ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पैसा हा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकजण पैसा कमवण्याचा प्रयत्न करत असतो.
पैसा ही एकमेव गोष्ट आहे जी अडीअडचणीला माणसाला कामी येते त्यामुळे पैशाची बचत करणेही तितकंच महत्त्वाचं आहे.
अनेकदा खूप प्रयत्न करुनही मनाप्रमाणे पैशाची बचत होत नाही.
तर आजच जाणून घ्या कमी पगारात जास्त बचत कशी कराल
पगार येताच आधी बचत करावी मग योग्य खर्च करावा
शाँपिंगला जाण्यापूर्वी आपण काय खरेदी करणार आहोत, याची एक लिस्ट करावी आणि आवश्यक तेवढ्याच वस्तू खरेदी कराव्यात.
खरेदी करताना विचार करून खर्च करावा आणि अनावश्यक वस्तुंवर कधीच खर्च करू नये
खरेदी केल्यानंतर वस्तूंची नोंद ठेवावी. त्यामुळे तुम्हाला तुम्ही किती पैसे खरेदी केले याची नोंद होणार.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑनलाईन पेमेंट ऐवजी कॅशने सर्व पैसा खर्च करावा.
गरज म्हणून वस्तू खरेदी करा. जर गरज नसली तरी खरेदी करणे टाळा.