Manasvi Choudhary
हिंदू धर्मात रांगोळी काढण्याला विशेष महत्व आहे. दिवाळी या सणाला घरोघरी रांगोळी काढतात.
दिवाळीत पाच दिवस दररोज दारासमोर नवीन रांगोळी काढली जाते. लहान व मोठ्या स्वरूपाच्या रांगोळ्या काढल्या जातात.
पण तुम्हाला माहितीये का, दारासमोर काढलेली रांगोळीचा देखील तुम्ही उपयोग करू शकता.
स्वंयपाकघरातील भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या रांगोळीचा वापर करू शकता. भांड्याचे काळे डाग काढण्यासाठी तुम्ही या रांगोळीचा वापर करा.
रांगोळीमध्ये तुम्ही भांडी घासण्याचे लिक्विड मिक्स करून तारेच्या घासणीने घासल्यास भांड्याचा काळवटपणा निघून जातो.
तांब्याची, पितळेची भांडी घासण्यासाठी देखील तुम्ही या रांगोळीचा वापर करा. चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पांढऱ्या रंगाच्या रांगोळीचा वापर करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.