ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या कपड्यांवर कधीकधी तेलाचे किंवा खाद्यपदार्थांचे डाग पडलेले असतात.
कपड्यांवर पडलेले तेलाचे डाग काढण्यासाठी आपला बराच वेळ देखील जातो.
काही नागरिक तेलाचे डाग असलेले कपडे शक्यतो घालण्याचे टाळतात.
आज तुम्हाला कपड्यांवरती पडलेले तेलकट डाग कसे काढू शकता, याबद्दल काही सोप्या ट्रिक सांगणार आहोत.
कपड्यांवर जर तेलाचे डाग पडले असतील तर, तुम्ही इन्स्टंट उपाय म्हणून त्या जागेवर बेबी पावडरचा वापर करु शकता.
ज्या जागेवर तेलाचा डाग पडला असेल त्यावर थोडे लिक्विड डिशवॅाश टाकून ठेवा. यानंतर तो कपडा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
ज्या जागेवर तेलाचा डाग पडला असेल त्याला आधी पेपर टॅावेलने पुसण्याचे ट्राय करा. यानंतर त्यावर बेकिंग सोडा टाकून ब्रशने साफ करुन घ्या.
NEXT: जान्हवीची कातिल अदा पाहून चाहते घायाळ, लेटेस्ट फोटोनीं केला कहर