Double chin: डबल चिन कसं कमी कराल? पाहा सोपे उपाय

Surabhi Jayashree Jagdish

सर्वसाधारण समस्या

आजकाल अनेकांना काही सामान्य शारीरिक समस्या जाणवतात. त्यापैकी डबल चिन ही एक मोठी तक्रार आहे. ही समस्या तुमच्या लूकवर परिणाम करते.

लुकवर परिणाम

डबल चिनमुळे चेहऱ्याचा संपूर्ण लुक बदलतो. फेस कट दिसेनासे होतात. म्हणून अनेकजण यावर उपाय शोधत असतात.

दोन सोपे उपाय

डबल चिन कमी करण्यासाठी दोन सोपे व्यायाम उपयुक्त ठरतात. हे नियमित केल्यास फरक जाणवू शकतो.

पहिला गोलाकार स्ट्रेच

पहिल्या स्ट्रेचमध्ये हनुवटी गोल फिरवायची आहे. सुरुवातीला हनुवटी खाली झुकवा. यानंतर हालचाल सुरू करा.

खांद्यांकडे वळवत हालचाल

हनुवटी एका खांद्याकडे वळवा आणि मग हळूहळू वर नेत दुसऱ्या खांद्याकडे न्या. त्यानंतर पुन्हा खाली या. असं चार ते पाच वेळा करा.

उलट दिशेने आणि तोंड रिलॅक्स

आता हीच हालचाल उलट दिशेने करा. हे करताना ओठ आणि तोंड आरामात बंद ठेवा. चेहऱ्यावर ताण येणार नाही याची काळजी घ्या.

दुसरा साइड स्ट्रेच

दुसऱ्या प्रकारात हनुवटी बाजूला झुकवा आणि कान खांद्याजवळ आणण्याचा प्रयत्न करा. मग परत सरळ व्हा आणि दुसऱ्या बाजूने हीच हालचाल करा.

Kolhapur Tourism: खरंच लोणावळा-खंडाळा विसराल; कोल्हापूरपासून फक्त २१ किमी लांब आहे हे हिल स्टेशन

येथे क्लिक करा