Dhanshri Shintre
मुंबईहून तुम्ही थेट हरिद्वार किंवा ऋषिकेशसाठी ट्रेन पकडू शकता. कोकणकाशी किंवा मध्य रेल्वेमार्गे अनेक एक्सप्रेस गाड्या उपलब्ध आहेत. प्रवास साधारण २४ ते ३० तासांचा असतो.
मुंबई एयरपोर्टवरून देहरादूनच्या जॉलीग्रँट विमानतळासाठी थेट किंवा कनेक्टिंग फ्लाइट मिळते. फ्लाइटचा कालावधी अंदाजे २.१५ ते ३ तास. हे सर्वात वेगवान माध्यम आहे.
देहरादूनला उतरल्यानंतर बस, कॅब किंवा टॅक्सीने ऋषिकेशला जावे लागते. अंतर सुमारे २०–२५ किमी. हा प्रवास ३०-४५ मिनिटांचा असतो.
ऋषिकेशहून गुप्तकाशी, सोनप्रयागकडे जाणाऱ्या बस सेवा व शेअर्ड टॅक्सी उपलब्ध. पर्वतीय रस्ता असल्यामुळे प्रवास ७–८ तासांचा असतो.
सोनप्रयागपासून गोरिकुंडपर्यंत वाहनांना परवानगी नसते. त्यामुळे सरकारच्या शटल वाहनानेच गोरिकुंडपर्यंत जावे लागते.
गोरिकुंडपासून केदारनाथपर्यंत सुमारे १६-१८ किमीचा ट्रेक आहे. साधारण ६–८ तास लागू शकतात. मार्ग डोंगराळ व थंड हवामानाचा असल्याने काळजी घेणे गरजेचे.
ऋषिकेश, गुप्तकाशी, सोनप्रयाग आणि गोरिकुंड येथे हॉटेल, धर्मशाळा व लॉज उपलब्ध. मंदिर परिसरातही टेंट सिटी उपलब्ध असते.
ऋषिकेश, गुप्तकाशी, सोनप्रयाग आणि गोरिकुंड येथे हॉटेल, धर्मशाळा व लॉज उपलब्ध. मंदिर परिसरातही टेंट सिटी उपलब्ध असते.