Ankush Dhavre
कुत्र्यांना मानवांपेक्षा अधिक निष्ठावान मानलं जातं.
त्यांना मानवाचा सर्वात चांगला मित्रही म्हटलं जातं.
मात्र दिवसेंदिवस भटक्या कुंत्र्यांनी लहान मुलांवर आणि मोठ्यांवर हल्ला करण्याच्या घटना वाढल्या आहेत.
हे हल्ले टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा
भटका कुत्रा समोर आल्यास त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहु नका. त्यांना ही धोक्याची घंटा वाटते, म्हणून ते हल्ला करतात.
भटके कुत्रे दिसल्यास पळू नका. असं केल्यास ते तुमचा पाठलाग करत तुम्हाला चावण्यासाठी तुमच्या मागे येऊ शकतात. तुम्ही त्यांच्याकडे न पाहता सरळ निघून जा.
भटक्या कुत्र्यांपासून सुरक्षित अंतर बनवून ठेवा. जरी तुम्ही त्यांच्या अगदी जवळून जात असाल तरी त्यांच्यापासून शक्य होईल तितकं अंतर बनवून ठेवा.
जर तुमच्या परिसरात आक्रमक कुत्रे असतील तर तुम्ही त्याची तक्रार स्थानिक प्राणी नियंत्रण किंवा प्राणी कल्याण संस्थेकडे करा
जर तुमच्याकडे छत्री किंवा काठी असेल तर त्याचा वापर तुम्ही स्वत:चा बचाव करण्यासाठी करू शकतात.