Summer Diseases: उष्मा लाटेपासून बचाव कसा करावा? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

Dhanshri Shintre

पाणी प्या

तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी प्या, शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी सेवन करा.

छत्रीचा वापर

घराबाहेर जाताना डोके सूर्याच्या तीव्र किरणांपासून संरक्षित ठेवण्यासाठी टोपी घाला किंवा छत्रीचा वापर अवश्य करा.

आरोग्याची काळजी घ्या

दुपारच्या तीव्र उन्हापासून बचावासाठी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे शक्यतो टाळा, आरोग्याची काळजी घ्या.

सूर्यप्रकाश रोखा

सूर्यप्रकाश रोखण्यासाठी घरातील पडदे घट्ट लावा, त्यामुळे उष्णतेपासून बचाव करता येईल.

जड कामे टाळा

तीव्र उन्हात जड कामे टाळा आणि प्रवास करताना शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी नेहमी पिण्याचे पाणी सोबत ठेवा

उष्णतेपासून बचाव करा

उन्हात काम करताना टोपी, छत्री किंवा ओला कपडा वापरून डोके, मान आणि चेहरा संरक्षित ठेवा, उष्णतेपासून बचाव करा.

उन्हाच्या झटक्याची लक्षणे

अशक्तपणा, डोकेदुखी, जास्त घाम येणे ही उन्हाच्या झटक्याची लक्षणे ओळखा आणि चक्कर आल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गुरांना सुरक्षित ठेवा

गुरांना छावणीत सुरक्षित ठेवा आणि त्यांना पुरेसे पाणी मिळेल याची खात्री करून उष्णतेपासून त्यांचे संरक्षण करा.

NEXT: रोज सकाळी प्या ब्लॅक कॉफी, कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

येथे क्लिक करा