Surabhi Jayashree Jagdish
चेकबुक बँकेकडून दिली जाणारी एक महत्त्वाची सुविधा आहे.
चेकबुकमुळे बँक खातेदारांना त्यांच्या बँकेत जमा असलेल्या पैशांचा वापर करण्याची परवानगी मिळते.
जाणून घेऊया की चेकबुक बँकेतून ऑनलाइन कशी मागवता येऊ शकते.
नवीन चेकबुकसाठी तुम्ही ऑनलाइनसोबतच अनेक प्रकारे अर्ज करू शकता.
बँकेतून ऑनलाइन चेकबुक मागवण्यासाठी तुमच्या बँकेच्या ऑनलाइन बँकिंग पोर्टल किंवा मोबाईल अॅपमध्ये लॉग इन करा.
यानंतर "चेकबुक रिक्वेस्ट" वर क्लिक करा आणि सेवेस किंवा रिक्वेस्ट सेक्शनमध्ये "नवीन चेकबुक रिक्वेस्ट" या ऑप्शनवर क्लिक करा.
आता डिटेल्स सेक्शनमध्ये तुमचा अकाऊंट नंबर आणि मागितलेली इतर माहिती भरा. नवीन चेकबुकसाठी सर्व माहिती भरल्यानंतर रिक्वेस्ट सबमिट करा.
चेकबुकसाठी ऑनलाइन रिक्वेस्ट सबमिट झाल्यानंतर तुम्हाला डिलिव्हरीचा वेळ आणि इतर माहिती ईमेलवर मिळेल.