Manasvi Choudhary
हिवाळ्यात केस चिकट होण्याच्या समस्येने अनेक महिला त्रस्त आहेत.
वातावरणातील बदलामुळे हिवाळ्यात केस चिकट होण्याच्या समस्या वाढतच आहेत.
तुमचेही केस चिकट होत असतील तर तुम्ही काही घरगुती टिप्स फॉलो करा.
केस धुताना तुम्ही शॅम्पू टाळूवर लावून मसाज करा.
केसांच्या मुळांना कधीही कंडिशनर लावू नये. केसांच्या मुळांना कंडिशनर लावल्यास केस तेलकट होतात.
केस धुण्यासाठी जास्त गरम पाणी वापरू नका यामुळे टाळूला त्रास होतो.
तुमच्या हातावर तेल, घाण किंवा आर्द्रता असते. केसांना वारंवार हात लावल्यास हे तेल केसांमध्ये हस्तांतरित होते आणि केस चिकट होतात.
हिवाळ्यात तेल मालिश करणे आवश्यक असले तरी, जर केस आधीच चिकट होत असतील, तर तेलाचा वापर कमी करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.