Manasvi Choudhary
सकाळच्या नाश्त्यामध्ये हलका आणि पौष्टिक आहार म्हणून उत्तपम सँडवीच खा.
उत्तपम सँडवीच हा एक अतिशय चविष्ट पदार्थ आहे.
उत्तपम सॅंडवीच बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्रितपणे मिसळा.
दुसऱ्या एका भांड्यात डोसा पीठ, पालक प्युरी आणि मीठ घालून एकत्रितपणे मिसळून घ्या.
गॅसवर पॅन गरम करून त्यावर एकत्र केलेले मिश्रण घालून त्यावर चिरलेल्या भाज्यांचे मिश्रण पसरवा.
त्यानंतर, उत्तपम दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या
आता या उत्तपमवर हिरवी चटणी पसरवा, त्यावर हवे असल्यास चीज घाला. तसेच, टोमॅटो सॉस घाला. आता या उत्तपमवर दुसरे उत्तपम झाका.
त्यानंतर, हे दोन्ही उत्तपम सॅंडविचप्रमाणे अर्धे कापून गरमागरम सर्व्ह करा. तुमचे सॅंडविच उत्तपम तयार आहे.