Sakshi Sunil Jadhav
चिकन आळणी रस्सा हा कोल्हापूरमधील पारंपरिक पदार्थ असून तो साध्या मसाल्यांमध्ये बनवला जातो.
अळणी रश्शामध्ये तिखट मसाले कमी वापरले जातात, त्यामुळे त्याची चव हलकी आणि घरगुती लागते.
500 ग्रॅम चिकन, कांदा, आले-लसूण पेस्ट, हळद, धणे पूड, जिरे पूड, काळी मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र आणि मीठ.
सुरुवातीला तेल गरम करून त्यात लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि तमालपत्र घालून फोडणी द्या.
यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी रंग येईपर्यंत परतल्याने रस्सा छान होतो.
चिकनचे तुकडे घालून काही मिनिटे परतून त्यात हळद, धणे पूड आणि जिरे पूड मिक्स करुन घ्या.
मसाल्यात चिकन नीट परतल्यावर त्यात पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
चिकन शिजल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्याने रस्सा अधिक सुगंधी होतो. गरमागरम चिकन आळणी रस्सा ज्वारीची भाकरी, चपाती किंवा भातासोबत खा.