Siddhi Hande
मटकीची भाजी तर आपण नेहमीच खातो. मटकीची उसळदेखील अनेकांना आवडते.
तुम्ही घरीच मटकीची तिखट उसळ बनवू शकता. ही रेसिपी खूप सोपी आहे.
मोड आलेली मटकी, कांदा, टॉमेटो, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, गोडा मसाला, हिंग, तेल, जिरं
सर्वात आधी तुम्हाला मटकी भिजत ठेवायची आहे. मटकीला मोड येऊ द्या. यानंतर मोड आलेली मटकी धुवून घ्या.
एका कढईत २-३ चमचे तेल टाका. त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिंग टाकून फोडणी द्या.
यात बारीक चिरलेला कांदा टाका. त्यात आलं लसूण पेस्ट, टॉमेटो टाकून चांगलं परतून घ्या.
यानंतर लाल तिखट, हळद, गोडा मसाला आणि गरम मसाला टाका. यामुळे उसळ झणझणीत होईल.
यामध्ये अर्धा कप पाणी आणि मीठ टाका. ही मटकी ५-७ मिनिटे वाफेवर शिजवून घ्या.
यानंतर या गरम केलेले पाणी टाका. छान उकळी येऊ द्या. यावर तुम्ही कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.