ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळा असो वा पावसाळा नाश्त्यासाठी इडली खायला प्रत्येकालाच आवडते.
चला आज आपण हॉटेल स्टाईल मेथी इडली कशी तयार करायची? हे जाणून घेऊ.
तांदूळ, मेथीचे दाणे, उडदाची डाळ, मीठ, तेल इ.
डाळ आणि मेथी धुवून ४ ते ५ तास पाण्यात भिजत ठेवा. त्याचप्रमाणे तांदूळ भिजवा.
आता भिजवलेली डाळ, तांदूळ मिक्सरला बारिक वाटून घ्या. मिश्रण जास्त पातळ नको.
आता संपुर्ण मिश्रण ८ ते १० तास भिजत ठेवा. हे पीठ फेसाळले की तयार आहे.
आता इडलीच्या साच्यासा तेल लावून पीठ ओता आणि १० मिनिटे वाफवून घ्या.
टोथपिक घालून इडली तयार आहे का तपासा.
गरम गरम, सॉफ्ट आणि स्पॉंजी इडली खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.