Manasvi Choudhary
जेवणाची चव वाढवण्यासाठी ताटात लाल मिरचीची चटणी वाढली जाते. लाल मिरचीची चटणी बनवण्याची पद्धत सोपी आहे.
लाल मिरचीची चटणी बनवण्यासाठी लाल मिरच्या, लसूण, मीठ, धने, बडीशेप, तेल, जिरे हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम लाल मिरच्या नीट धुवून सुकवून घ्या. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरची आणि लसूण पाकळ्या बारीक करा.
या मिश्रणात बडीशेप, धने, मीठ हे मिक्स करा आणि चांगले बारीक करा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे घाला. यामध्ये नंतर तयार मिरचीची चटणीला मस्त तडका द्या.
अशाप्रकारे सर्व्ह करण्यासाठी लाल मिरचीची चटणी तयार आहे.