Sakshi Sunil Jadhav
आंबा पोळीही उन्हाळ्यात अनेकांच्या घरात बनवली जाते. लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पदार्थ खायला आवडतो.
आंबा पोळी खायली जितकी चटपटीत आहे, तितकीच बनवायला सोपी आहे. पण अनेकांना बनवताना त्यामध्ये अडथळे येऊ शकतात.
आंबा पोळी बनवताना बऱ्याचदा चिकट किंवा कडक होते. आता तुम्हाला सोप्या पद्धतीत ही रेसिपी बनवता येणार आहे.
पिकलेला आंबे ३, गूळ दिड वाटी, लिंबाचा रस, वेलची पुड, मीठ, तेल इ.
सर्वप्रथम आंबा स्वच्छ धुवून घ्या. मग त्याच्या साली काढून काप करा.
आंबे निवडताना जास्तच पिकलेले आंबे निवडू नका. पुढे आंब्याचा तुकडे करुन घ्या.
आता तुम्ही केलेले तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात बारिक वाटून घ्या. त्यामध्ये पाणी घालू नका.
आंब्याची पेस्ट करताना थांबा. मग दुसरीकडे कढईत चमचाभर तूप घालून घ्या.
पुढे आंब्याच्या पेस्टमध्ये साखर आणि २ चमचे वेलची पुड, मीठ, लिंबाचा रस घालून घट्ट पेस्ट तयार करा.
शेवटी एका ताटाला तेल लावून मिश्रण त्यात ओता आणि उन्हात सुकवून घ्या. पुर्णपणे मिश्रण सुकलं की तुमची आंबा पोळीची रेसिपी तयार होईल.