Manasvi Choudhary
हिवाळ्यात थंड वातावरणात गरमा गरम पदार्थ खाण्याची मज्जाच वेगळी असते. थंडीत मस्त गरमा गरम मशरूम सूप तुम्ही घरच्या घरी बनवू शकता.
मशरूम सूप प्यायल्याने सर्दी व खोकल्याच्या त्रासापासूनही आराम मिळतो.
मशरूम, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, बटर, मिरीपूड, मीठ, दूध, लिंबू हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम मशरूम, कांदा, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे बारीक चिरून घ्या. गॅसवर एका पॅनमध्ये बटर घालून त्यावर आलं लसूण, कांदा, कोथिंबीर चांगले परतून घ्या.
नंतर मिश्रणात मीठ आणि मिरीपावडर घालून एकत्र मिक्स करा. संपूर्ण मिश्रण चांगले थंड होऊन त्यामध्ये दूध मिक्स करा.
मिश्रणात मशरूम धुवून घाला यानंतर कढईमध्ये ऑलिव्ह ऑईल टाकून त्यात मशरूम आणि बारीक चिरलेला लसूण घालून शिजवून घ्या.
गॅसवर दुसऱ्या बाजूला पॅनध्ये बटर टाका नंतर त्यात मैदा घालून मशरूम आणि भाज्या मिक्स करा. मिश्रण सारखे ढवळत राहा. सूप घट्ट झाले की त्यात सोया सॉस आणि फ्रेश क्रिम मिक्स करा.