Sakshi Sunil Jadhav
उन्हाळ्यात तुम्हाला काही थंडगार खायची इच्छा होत असेल तर लगेचच बनवा थंडगार मॅंगो पॉप्लिकल्स. पुढे याची सोपी रेसिपी दिली आहे.
१ कप आंब्याचा ताजा रस, १ चमचे साखर, वेलची पावडर, १ कप पाणी, स्ट्रॉबेरी आणि द्राक्षांच्या फोडी इ.
पिकलेले गोड आंबे घ्या, सोलून त्यांचा गर वेगळा करा.
मिक्सरमध्ये आंब्याचा गर, साखर (चवीनुसार) आणि थोडं दूध किंवा पाणी घाला. मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत नीट ब्लेंड करा.
चव वाढवण्यासाठी थोडं वेलची पावडर किंवा लिंबाचा रस घालू शकता.
तयार मिश्रण पॉप्सिकल मोल्डमध्ये ओता. मोल्ड नसेल तर छोटे ग्लास किंवा कप वापरू शकता.
आता यामध्ये आईस्क्रीम स्टिक्स किंवा लाकडी काड्या ठेवा. हे सर्व फ्रीजरमध्ये किमान 6 ते 8 तासांसाठी ठेवा.
पूर्ण सेट झाल्यावर मोल्ड बाहेर काढून थोडं पाण्यात बुडवा, त्यामुळे पॉप्सिकल सहज बाहेर येतील. आता थंडगार आणि चविष्ट मॅंगो पॉप्सिकल्स सर्व्ह करा आणि उन्हाळ्याचा आनंद घ्या.