ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलांची झोप पूर्ण झाल्यावर, ते चांगले खेळतात आणि अॅक्टिव्ह राहतात. काही मुले रात्री टिव्ही आणि मोबाईल बघत राहिल्यामुळे वेळेवर झोपत नाही.
मुलांना वेळेवर झोपवणे हा पालकांसाठी मोठा टास्क आहे. त्यांना लवकर झोपवणे आणि सकाळी शाळेसाठी लवकर उठवणे हे एक मोठे काम आहे.
जर तुमची ही मुले लवकर झोपत नसतील तर, काहि टिप्स आहेत त्या फॉलो टिप्सच्या मदतीने मुलांना लवकर झोपवण्यास मदत होईल.
सर्वात आधी घरातील जेवणाचा टाईम ठरवून घ्या. जसे की, ९ वाजता सगळ्यांनी जेवण केले पाहिजे, जेणेकरुन १० वाजेरपर्यंत झोपू शकता.
मुलांना झोपविण्यासाठी शांत वातावरण बनवणे गरजेचे आहे. यासाठी पालकांनीसुध्दा झोपण्याची तयारी करावी आणि लाईट बंद करुन घ्यावी.
घरी सगळ्यांसाठी जेवणाचे आणि झोपण्याचे रुटिन सेट करावे. रुटिन ठरवल्याने लहान मुले लवकर झोपण्यास तयार होतील.
रात्री झोपण्याआधी मुलांना मोबाईल आणि टिव्ही बघून देऊ नका. स्क्रिन टाईम राहिल्यास झोप उडते.
मुलांना संध्याकाळी बाहेर खेळायला पाठवावे. खेळल्यावर मुले थकून जातात आणि त्यामुळे रात्री लवकर झोपण्यास मदत होते.
काही मुलांना रात्री झोपण्यासाठीचे कपडे कंफर्टेबेल नसतील तर झोप लागत नाही. मुलांना झोपताना नेहमी हलके आणि कंफर्टेबेल कपडे घालून झोपवावे.
मुलांना झोप नसेल येत तर, त्यांना एखादी गोष्ट सांगा किंवा दिवसभरातल्या गोष्टींबद्दल गप्पा मारा.