ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मिसळ ही केवळ बाहेरच खाता येते असं नाही. तुमच्या घरी एखादा कार्यक्रम असेल तर तुम्ही मस्तपैकी फक्कड मिसळ घरीही तयार करू शकता. घरगुती मिसळ तयार करण्याची रेसिपी आपण इथे जाणून घेऊया.
1 कप मोड आलेली मटकी,1 कप मोड आलेले मूग,1 बारीक कापलेला कांदा, 1 बारीक कापलेला टॉमेटो, आलं लसूण पेस्ट, 2 चमचे तिखट, 1 चमचा धनेपूड , 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा जिरे आणि मोहरी , अर्धा चमचा हळद , फोडणीसाठी तेल, आवश्यकतेनुसार मीठ आणि पाणी, पाव
सर्वात पहिल्यांदा मूग, मटकी, वाटाणा पाण्यात स्वच्छ धुवा आणि रात्री पाण्यात भिजत घालून मोड येण्यासाठी एका स्वच्छ कपड्यात बांधून ठेवा
सकाळी मोड आलेली मटकी, मूग, वाटाणा कुकरमध्ये हळद घालून तीन शिट्टी देऊन शिजवा
नंतर एका पातेल्यात तेल गरम करून घ्या आणि तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिंगाची फोडणी करून कांदा परतून घ्या
त्यानंतर त्यात आलं – लसूण पेस्ट घालून परतून घ्या नंतर त्यात लाल तिखट, मीठ, हळद, धने पूड, आमचूर पावडर घालून मिक्स करा.
त्यामध्ये वाफवलेली मटकी, वाटाणा आणि मूग घालून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवा
त्यामध्ये वरून पाणी घाला आणि उकळी काढा. उकळताना त्यात थोडासा बाजारात मिळणारा मिसळ मसाला तुम्ही घाला आणि शिजू द्या
मिसळ तयार झाल्यावर एका बाऊलमध्ये काढा, त्यात वर कांदा, फरसाण, चिरलेली कोथिंबीर पेरा. बाजूला एका डिशमध्ये वेगळा कापलेला कांदा, लिंबू आणि पाव ठेवा आणि मस्तपैकी गरम मिसळीचा आनंद लुटा