Manasvi Choudhary
चटपटीत पदार्थाची चव वाढवाणारी शेजवान चटणी खायला सर्वांनाच आवडते.
हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण हमखास शेजवान चटणीसोबत विविध पदार्थ खातो.
आता शेजवान चटणी घरी बनवण्याची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शेजवान चटणी बनवण्यासाठी लाल मिरची, आलं, व्हिनेगर, सोया सॉस, लसूण पाकळ्या, मीठ आणि तेल हे साहित्य तयार ठेवा.
शेजवान चटणी बनवण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही लाल सुक्या मिरचीच्या बिया काढून पाण्यात भिजत ठेवा.
अर्धा तास मिरच्या भिजल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या. मिरचीची पेस्ट बनवताना मिश्रणात पाणी घालू नका ही काळजी घ्या.
गॅसवर पॅनमध्ये तेलामध्ये लसूण आणि बारीक आलं भाजून घ्या नंतर यामध्ये मिरचीची पेस्ट घाला.
पेस्ट चांगली भाजल्यानंतर त्यात सोया सॉस, व्हिनेगर आणि मीठ टाकून परतून घ्या.
संपूर्ण मिश्रण चांगले परतून घेतल्यानंतर तुमची शेजवान चटणी तयार होईल.