Manasvi Choudhary
पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्याला चटपटीत काहीतरी खायचं असेल तर तुम्ही क्रिस्पी कॉर्न फ्राईज स्टिक ही रेसिपी ट्राय करा.
क्रिस्पी कॉर्न फ्राईज स्टिक्स हा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. तुम्ही घरच्या घरी ही सोपी रेसिपी ट्राय करू शकता.
मक्याचे दाणे, कॉर्न फ्लोअर, तांदळाचे पीठ, आलं- लसूण पेस्ट, मसाला, हळद, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ हे साहित्य घ्या.
क्रिस्पी कॉर्न फ्राईज स्टिक रेसिपी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मक्याचे दाण्याचे बारीक पेस्ट करा.
एका बाऊलमध्ये मक्याची पेस्ट घ्या. त्यात कॉर्न फ्लोअर, तांदळाचे पीठ, आले-लसूण पेस्ट, सर्व मसाले आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मळून घ्या. हे मिश्रण खूप घट्ट किंवा खूप पातळ करू नका.
नंतर मिश्रणाचे गोळा करा. एका ट्रेमध्ये थापून सुरीने लांब पट्ट्याच्या आकारात कापून घ्या.
कढईत गरम तेलामध्ये मक्याचे स्टिक्स दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाचे होईपर्यंत फ्राय करा.