Manasvi Choudhary
शेपूची भाजी खायला नाक मुरडतात. मात्र शेपूची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
शेपूच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, लोह, कॅल्शियम हे घटक आहे. शेपूची भाजी पचायला हलकी असल्याने आहारात समावेश करा.
शेपूची भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच ही रेसिपी बनवू शकता.
शेपूची भाजी बनवण्यासाठी शेपू, मूग डाळ, लसूण, हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट, तेल, मीठ हे साहित्य घ्या.
भाजी बनवण्यासाठी शेपूची भाजी स्वच्छ निवडून धुवून घ्या त्यानंतर भाजी बारीक कापा.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे टाका नंतर यात लसूण आणि हिरवी मिरची घालून चांगली परतून घ्या.
नंतर या मिश्रणात भिजवलेली मूग डाळ घालून संपूर्ण मिश्रण चांगले परतून घ्या.
नंतर मिश्रणात बारीक चिरलेली शेपूची भाजी मिक्स करा. भाजीवर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या.
भाजी शिजली की त्यात शेंगदाण्याचा कूट मिक्स करा. अशाप्रकारे घरच्या घीर शेपूची भाजी तयार होईल.