Manasvi Choudhary
मुगाची चविष्य खिचडी खायला सर्वानाच आवडते. पापड आणि दहीसोबत मुगाची खिचडी अत्यंत चविष्ट लागते.
मात्र अनेकांना मऊ आणि चविष्ट खिचडी बनवता येत नाही. यामुळेच आज आम्ही तुम्हाला मुगाच्या खिचडीची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मुगाची डाळ व तांदूळ पाच ते दहा मिनिट भिजत घालावे
नंतर कांदा हिरवी मिरची बारीक चिरून घ्या गॅसवर कुकरमध्ये गरम तेलामध्ये जीरे मोहरी हिरवी मिरची कढीपत्ता घालून फोडणी द्या
नंतर त्यात कांदा घालावा शेंगदाणे घाला. कांदा गुलाबीसर झाला कि त्यात डाळ व तांदूळ घालून मिक्स करून घ्या.
डाळ व तांदूळ घातल्यानंतर पाच मिनिटे तेलात परतून घ्यानंतर त्यात हळद, मसाला घालून घ्यावे सर्व मिक्स करावे मीठ घालून घ्यावे परत सगळे मिश्रण परतून घ्या
संपूर्ण मिश्रणात एक कप पाणी घाला आणि कुकरचे झाकण लावून शिजवून घ्या. १५ ते २० मिनिटे झाल्यानंतर मुगाची मऊ चविष्ट खिचडी तयार होईल.