Manasvi Choudhary
शेगाव कचोरी खायला सर्वांनाच आवडते.शेगाव कचोरी प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे.
शेगाव कचोरी घरी बनवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे.
शेंगाव कचोरी बनवण्यासाठी मैदा, तेल, बेसन, लाल मसाला, हळद, आमचूर पावडर, गरम मसाला, कस्तुरी मेथी, मोहरी, हिरव्या मिरच्या, लसूण, आले, तेल, धने, बडीशेप, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वात प्रथम एका भांड्यात मैदा, तेल आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व व्यवस्थित मिसळून घ्या.
मिश्रणात थोड थोड पाणी घालून त्याचा गोळा बनवून घ्या. हा तयार गोळा १५-२० मिनिट बाजूला झाकून ठेवा म्हणजे तो छान मऊ राहील.
पिठाचा गोळा मऊ होईपर्यंत कचोरीच स्टफिंग बनवून घ्या. गॅसवर पॅनमध्ये धने,जिरे आणि बडीशेप घाला आणि त्याला छान भाजून घ्या मिक्सरला जाडसर वाटून घ्या.
नंतर ही पूड प्लेट मध्ये काढून घ्या आणि त्याच भांड्यात हिरवी मिरची चे काप,लसूण पाकळ्या आणि आल्याचे काप घाला आणि त्याची पेस्ट बनवून घ्या.
आता पॅन मध्ये गरम तेलामध्ये मोहरी,जिरेची फोडणी द्या नंतर यात आल,लसूण,मिरचीची पेस्ट घालून परतून घ्या.
संपूर्ण मिश्रणात नंतर लाल तिखट, हळद,गरम मसाला,आमचूर पावडर आणि कस्तुरी मेथी घाला आणि सर्व मसाले तेला मध्ये परतून घ्या.
मसाले छान परतून झाले की त्यात बेसन घाला आणि बेसन छान भाजेपर्यंत गॅस मंद ठेवा.
आता चवीप्रमाणे मीठ घाला आणि बेसन २-३ मिनिट झाकून ठेवून कमी गॅसवर शिजवून घ्या.आपल कचोरी च स्टफिंग तयार आहे.स्टफिंग थंड व्हायला ठेवा.
आता पोळपाट वर ठेवून हा गोळा हलक्या हाताने लाटून घ्या.आणि अश्याप्रकारे सर्व कचोऱ्या तयार करून घ्या.
आता कढई मध्ये तेल गरम झाले की त्यात एक एक कचोरी घालून तिला मध्यम आचेवर छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.अश्याप्रकरे सर्व कचोऱ्या तळून घ्या.
अशाप्रकारे शेगाव स्पेशल कचोरी तयार आहे. गरमागरम सर्व्ह करा.