Sakshi Sunil Jadhav
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे ड्रिंक्स सगळ्यांनाच आवडतात. खास करून चॉकलेट आणि कॉफीचा परफेक्ट कॉम्बिनेशन असेलेली आईस चॉकलेट कोल्ड कॉफी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येते. जाणून घ्या रेसिपी.
दूध, कॉफी पावडर, चॉकलेट सिरप, साखर, आईस क्यूब्स आणि क्रीम इत्यादी साहित्य पुरेसं आहे.
एका कपात 1 चमचा कॉफी पावडर आणि थोडं कोमट पाणी घालून मिक्स करा.
मिक्सर जारमध्ये 1 ग्लास थंड दूध ओता. त्यात 2 चमचे चॉकलेट सिरप घाला.
आपल्या चवीप्रमाणे साखर घाला. ड्रिंक गोड असली तरी चवीला उत्तम असते.
तयार केलेलं कॉफी मिक्स जारमध्ये घाला. 4 ते 5 आईस क्यूब्स घालून सर्व मिश्रण चांगलं ब्लेंड करा.
ग्लासमध्ये आधी चॉकलेट सिरप फिरवा आणि त्यात तयार कॉफी ओता.
आता वरून व्हीप्ड क्रीम आणि चॉकलेट चिप्स घालून थंडगार सर्व्ह करा. जास्त चॉकलेटी फ्लेवरसाठी डार्क चॉकलेटही वापरू शकता.