Bhindi Rassa Bhaji Recipe: तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला, तर घरीच बनवा भेंडीची रस्सा भाजी

Manasvi Choudhary

भेंडी भाजी

झटपट होणारी अन् चवीला भारी भेंडीची भाजी सर्वांनाच आवडते. मात्र भेंडीची भाजी एकाच पद्धतीने खाऊन अनेकांना कंटाळा आला आहे.

Bhindi Recipe | Social Media

भेंडीची रस्सा भाजी

यासाठी आम्ही तुम्हाला भेंडीची रस्सा भाजी रेसिपी सांगणार आहोत. भेंडीचा रस्सा भाजी बनवण्याची घरगुती रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Bhindi Rassa Bhaji | Social Media

साहित्य

भेंडीची रस्सा भाजी बनवण्यासाठी भेंडी, दही, टोमॅटो, आलं. लसूण, हिरव्या मिरच्या, कांदा, हळद, मसाला, कस्तुरी मेथी, तेल , मीठ हे साहित्य घ्या.

Bhindi Rassa Bhaji | Social Media

भेंडी चिरून घ्या

सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून उभी चिरून घ्या. मिक्सरमध्ये टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या यांची एकत्र पेस्ट करा.

Bhindi Rassa Bhaji | Social Media

मिश्रण तयार करा

गॅसवर कढईत तेलामध्ये तयार पेस्ट मिक्स करा नंतर त्यात दही, गरम मसाला घाला. मिश्रणात चिरलेली भेंडी मिक्स करून घ्या .

Bhindi Rassa Bhaji | Social Media

मसाला पेस्ट करा

गॅसवर दुसऱ्या बाजूला कढईमध्ये गरम तेलामध्ये तेजपत्ता, बारीक चिरलेला कांदा, हळद, मिरची घाला. यानंतर यात दही आणि टोमॅटो पेस्ट घाला नंतर त्यात तयार भेंडीचे मिश्रण मिक्स करा.

Bhindi Rassa Bhaji | Social Media

मीठ टाका

संपूर्ण मिश्रणात एक कप पाणी घालून मिक्स करा आणि ढवळत राहा. मीठ टाकून भेंडीची रस्सा भाजी १० ते १५ मिनिटे शिजवून घ्या.

Bhindi Rassa Bhaji | Social Media

भेंडीची रस्सा भाजी तयार

अशाप्रकारे भेंडीची रस्सा भाजी सर्व्हसाठी तयार आहे.

Bhindi Rassa Bhaji | Social Media