दुकानात मिळणारी 'नानखटाई' घरी कशी बनवायची?| Homemade Nankhatai Recipe

Manasvi Choudhary

साहित्य

नानखटाई बनवण्यासाठी मैदा, पिठी साखर, तूप, बेसन, रवा, खाण्याचा सोडा, वेलची पावडर हे साहित्य तयार ठेवा.

Homemade Bakery Style Nankhatai | yandex

तूप आणि साखर मिक्स करा

सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात तूप आणि पिठीसाखर एकत्र घ्या. हे मिश्रण चांगले एकत्र करा म्हणजे नानखटाई खुसखुशीत होईल.

Creaming | yandex

साहित्य मिक्स करा

नंतर या मिश्रणात मैदा, बेसन, बारीक रवा आणि वेलची पावडर मिक्स करा. वेलची पावडरमुळे नानखटाईला चव आणि सुगंध येईल.

Mixing Dry Ingredients | GOOGLE

पीठ मळून घ्या

सर्व साहित्य एकत्र करून त्याचा गोळा तयार करा. नंतर या पिठाचे लहान-लहान गोळे करून नानखटाईसारखा आकार द्या.

Shaping

कढईत बेक करा

जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर गॅसवर कढईमध्ये मीठ किंवा वाळू घ्या. नंतर त्यात स्टीलचे स्टँड ठेवा आणि कढईवर झाकण ठेवा.

Baking

स्टीलच्या प्लेटला तूप लावा

स्टीलच्या प्लेटला तूप लावा आणि नंतर त्यात तयार नानखटाई बेक होण्यासाठी ठेवा. साधारणपणे १५ मिनिटांनंतर नानखटाई खालून हलकी सोनेरी दिसेल

Homemade Nakhatai Recipe

Next: महिलांमधील 'या' 5 सवयी नवऱ्याला बिलकूल आवडत नाही

Marriage Tips
येथे क्लिक करा..