ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवाळी हा सण फराळाशिवाय अपूर्ण आहे.
दिवाळी मध्ये घराघरात अनेक फराळाचे पदार्थ बनवले जातात.
दिवाळीत केल्या जाणाऱ्या फराळाची चव काही वेगळीच असते.
दिवाळीत फराळ महिनाभर फ्रेश ठेवण्यासाठी खास टिप्स फॉलो करा.
फराळाचे पदार्थ तयार करुन झाल्यावर शक्यतो स्टीलच्या भांड्यात स्टोर करुन ठेवा.
ज्या डब्यात फराळ स्टोर करुन ठेवलाय त्या डब्याची झाकणं नीट लागली आहे की नाही याची खात्री करुन घ्या. यामुळे पदार्थ मऊ पडणार नाहीत.
दिवाळीचा फराळ डब्यात ठेवण्यापूर्वी डब्याच्या तळाशी टिश्यू पेपर ठेवा.
फराळाचे पदार्थ नॉर्मल थंड झाल्यावर डब्यात स्टोर करा.
दिवाळीत फराळाचे पदार्थ गरम असताना डब्यात भरुन ठेवण्याची चूक करु नका. यामुळे ते खराब होऊ शकता.
NEXT: मृणाल ठाकूरचं सौंदर्य जणू फुललेला गुलमोहर