Satish Daud
आजकाल पार्टी करायची म्हटलं तर दारूचा विषय आला.
अनेक जणांना दारू शिवाय पार्टी करणे शक्यच होत नाही.
मात्र, आजकाल बनावट दारूचे प्रमाण देखील वाढलं आहे.
बनावट दारूने आतापर्यंत बऱ्याच जणांचा जीव घेतला आहे.
अशातच तुम्ही पित असलेली दारू बनावट तर नाही ना? हे तपासणं गरजेचं आहे.
बनावट दारूच्या बॉटलवर कंपनीचा नकली लोगो असतो. तो ओळखता आला पाहिजे.
याशिवाय बनावट दारू असेल तर कंपनीच्या नावाची अक्षरे देखील चुकीची असतात.
असली दारूमध्ये इथेनॉलचा वापर केला जातो.
नकली दारूमध्ये युरियासारखे केमिकल वापरले जातात.
नकली दारूच्या बॉटलचे लेबल बहुतांश वेळा तुटलेले असतात.
त्यामुळे तुम्ही सुद्धा दारू खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी तपासून पाहा