Vishal Gangurde
अनेकदा बाजारात कलिंगड विकत घेताना गोंधळ उडतो. अनेकांना कलिंगड गोड आणि रसाळ आहे की नाही, हे ओळखता येत नाही.
कलिंगड शरीराला अनेक आजारांपासून वाचवतं. कलिंगडामध्ये ९५ टक्के पाणी असतं. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता कधीच भासत नाही. watermelon
कलिंगड प्रत्येकवेळी गोड असेल असं नाही. त्यामुळे काही जण कमी गोड आणि लाल नसलेले कलिंगड आणतात.
कलिंगडावर काळा डाग किंवा एखादा डाग असला तरी ते कलिंगड आतून गोड असेल की नाही याची खात्री नाही.
कलिंगडाचा रंग पूर्णपणे हिरवा असतो किंवा त्यावर हिरवे आणि पिवळे रंगाचे दोन्ही पट्टे आहेत. गडद हिरव्या रंगाचा कलिंगड गोड असण्याची शक्यता आहे.
फिकट रंगाचं कलिंगड गोड आणि रसाळ नसतं. कलिंगड गुलाबी, पांढरे किंवा काळ्या रंगाचे असेल तर गोड नसते.
कलिंगड गोड आणि रसाळ असेल तर त्याचा वास येतो. कलिंगड जुनं किंवा खराब असल्यास त्याचा कडवट आणि आंबट वास येतो.