साम टिव्ही ब्युरो
हल्ली सर्वजण आपल्या पार्टनर सोबत फिरण्याचा प्लॅन करतात.
अशावेळी आपण तो क्षण खास करण्यासाठी चुंबन घेतो.
मात्र यावेळी आपण आधीच योग्यप्रकारे आपल्या ओंठाची काळजी घेतली पाहिजे.
आज आम्ही तुम्हाला ओठ स्वच्छ करण्याच्या या काही टिप्स सांगणार आहोत.
कोमट पाण्यात टॉवेल ओला करा आणि त्वचेच्या मृत पेशींपासून मुक्त होण्यासाठी गोलाकार हालचालीत ओठांना हलक्या पध्दतीने मसाज करा.
ओठांना आतून पोषण आणि एक्सफोलिएट करण्यासाठी तुम्हाला स्क्रबची गरज असते.
नारळाच्या तेलात एक चमचा साखर मिसळून घरी स्क्रब तयार करुन लावा.
ओठांवर कोरडेपणा जाणवल्यास तुमच्यासोबत लिपबाम ठेवा.
लाळ किंवा थुंकीचा वापर करुन ओठ ओले करु नका. जर तुम्हाला ही सवय असेल तर ती थांबवा. कारण त्यामुळे ओठ अधिक कोरडे पडतील. ते खराब दिसतील.