Sakshi Sunil Jadhav
सध्या वाढत्या बाटल्याच्या किंमती आणि दिवसांमुळे छोट्या LPG सिलेंडरची मागणी वाढत आहे. जे भाडेकरू, विद्यार्थी किंवा तात्पुरत्या राहणाऱ्यांसाठी 5 किलो ‘छोटू’ सिलेंडर सोयीचा ठरतो.
कोणत्याही अॅड्रेस प्रूफशिवायही हा सिलेंडर सहज मिळू शकतो. याच्यात पैसे परत मिळण्याची सुद्धा पद्धत सांगितली आहे.
छोट्या LPG सिलेंडरसाठी पक्का अॅड्रेस प्रूफ महत्वाचा नसतो. त्यामुळे भाडेकरू आणि विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय सोपा आणि सोयीस्कर वाटतो.
Aadhaar किंवा PAN कार्डसारखी महत्वाची ओळखपत्रेसोबत ठेवा. त्यावरुन तुम्हाला सहज कनेक्शन मिळू शकतं.
जवळच्या Bharatgas डिस्ट्रीब्यूटरकडे जाऊन छोटा सिक्योरिटी डिपॉजिट भरल्यावर लगेच 5kg सिलेंडर मिळतो.
Bharatgas साठी 1800 22 4344 या टोल-फ्री नंबरवर कॉल करून काही शहरांमध्ये 2 तासांत डिलिव्हरी मिळू शकते.
जवळच्या गॅस एजन्सी, किराणा दुकान किंवा रिटेल आउटलेटवरून फक्त ID दाखवून सिलेंडर घेता येतो.
HP Gas एजन्सी, पेट्रोल पंप किंवा रिटेल स्टोअरवरून सहज खरेदी करता येतो. हा Free Trade LPG मध्ये येतो.
सिलेंडर आणि रेग्युलेटर मिळून ₹1300 ते ₹1500 खर्च येतो. यात ₹1100 ते ₹1200 सिक्योरिटी डिपॉजिट असतं.
HP Pay अॅप, WhatsApp, IVRS, मिस्ड कॉल किंवा वेबसाइटद्वारे घरबसल्या रिफिल बुकिंग करता येतं.
वापर थांबवल्यास सिलेंडर परत केल्यावर तुम्हाला किमतीतून 50% सिक्योरिटी डिपॉजिट रिफंड मिळू शकतो.