Saam Tv
कपाटात अत्यंत मोजके कपडे ठेवून, त्यांच्या विविध कॉम्बिनेशन्सने अनेक नवे लुक्स तयार करण्याच्या पद्धतीला 'कैप्सूल वॉर्डरोब' म्हणतात.
सोशल मीडियामुळे रोज नवे कपडे खरेदी करणे महागात पडते. हा ट्रेंड फॉलो केल्याने पैसा आणि वेळ दोन्ही वाचते, तसेच कपाटात विनाकारण कपड्यांचा पसारा होत नाही.
एक साधा पांढरा शर्ट निळ्या जीन्ससोबत घातल्यास - कॅज्युअल लुक, काळ्या पँटसोबत घातल्यास - ऑफिस/फॉर्मल लुक करता येतो.
कपडे विकत घेण्यापूर्वी ते इतर किती कपड्यांसोबत मॅच होतील, याचा आधी विचार करावा.
सर्वात आधी कपाटातील तुम्ही नियमितपणे वापरत असलेले आणि आवडते कपडे वेगळे करा. तसेच न लागणारे किंवा एकदाच वापरलेले कपडे बाजूला काढून ठेवा.
पांढरा, काळा, निळा आणि बेज यांसारख्या मूलभूत रंगांचे कपडे वॉडरोब ठेवा. हे रंग एकमेकांसोबत सहज मॅच होतात. नंतर त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे २-३ ब्राइट रंग जोडू शकता.
कपडे तेच ठेवून केवळ शूज, बॅग, बेल्ट, गॉगल्स किंवा ज्वेलरी बदलून पूर्णपणे नवा लुक मिळवता येतो.
कमी कपडे खरेदी केल्याने 'फास्ट फॅशन'चा पसारा कमी होतो. हा ट्रेंड केवळ बजेट-फ्रेंडली नसून पर्यावरणासाठीही उत्तम मानला जातो.
कैप्सूल वॉर्डरोब म्हणजे फॅशन कमी करणे नव्हे, तर कमी कपड्यांतून स्मार्ट स्टाईल दाखवणे आहे.