Saam Tv
मध त्वचेला मॉइश्चर करण्यास मदत करते. मधाचा पातळ थर चेहऱ्याला लावा. काही मिनिटांनी धुवून टाका. हा उपाय काही दिवस केल्याने तेलकटपणा कमी होईल .
अॅलोवेरा जेल त्वचेला थंडावा देते. हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. त्वचा शांत होते आणि तेलकटपणा कमी होतो.
मुलतानी मातीत गुलाब पाणी मिसळून लेप बनवा, १५ मिनिटे चेहऱ्याला लावून पाण्याने धुवा. माती अतिरिक्त तेल खेचण्यास मदत करते.
बारीक केलेले ओट्स पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर थोड स्क्रब करा. त्यामुळे त्वचेवरील तेलकटपणाचा थर निघून जाईल.
थंड केलेली ग्रीन टी मऊ कापडाच्या मदतीने हलक्या हाताने चेहऱ्याला लावा. त्यामुळे तेलकटपणामुळे होणारी जळजळ, इंफेक्शन निघून जाईल .
बेसन,हळद, लिंबू आणि दूध एकत्र करून याची पेस्ट बनवा. २० मिनिटे चेहऱ्यावर राहूद्या. लिंबामुळे तेलकटपणा निघून जाईल आणि दुधामुळे त्वचा मऊ होईल .
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.