Home Loan : होम लोनच्या कटकटीतून बाहेर कसं पडायचं? वाचा सोप्या टिप्स

साम टिव्ही ब्युरो

रिझर्व्ह बँकेने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. यामुळे नागरिकांवरी गृहकर्जाच्या EMIचं ओझं आणखी वाढणार आहे.

Home loan | Saam TV

काही टिप्स फॉलो करुन तुम्ही गृहकर्जाच्या EMIचं ओझं कमी केलं जाऊ शकतं.

Home loan | Saam TV

गृहकर्जाची लवकर परतफेड करण्यासाठी, दरवर्षी कर्जाच्या बॅलेन्स रकमेच्या अतिरिक्त 5% रक्कम जमा करा. त्यामुळे मूळ रक्कम कमी होते आणि 20 वर्षांचे कर्ज 12 वर्षात पूर्ण होऊ शकते.

Home loan | Saam TV

वर्षभरात 12 ऐवजी 13 EMI भरा. दरवर्षी आणखी एक EMI ची रक्कम जमा करून, तुम्ही 20 वर्षांचे कर्ज 17 वर्षांत पूर्ण करू शकता.

Home loan | Saam TV

तुमचे मासिक उत्पन्न चांगले असेल तर तुम्ही बँकेशी बोलून ईएमआय वाढवू शकता. याद्वारे गृहकर्जाची परतफेड लवकर होईल.

Home loan | Saam TV

नोकरी करणाऱ्यांना नियमांनुसार गृहकर्ज परतफेडीच्या नावावर PF मधील रक्कम काढता येते. यातून तुम्ही गृहकर्जाची मूळ रक्कम कमी करू शकता.

Home loan | Saam TV

कधी-कधी तुमच्या कर्जाचा व्याजदर इतर बँकांच्या व्याजदराहून अधिक असते. अशावेळी तुम्ही तुमचं कर्ज कमी व्याजदर असलेल्या बँकेत ट्रान्सफर करू शकता.

Home loan | Saam TV

चांगला CIBIL स्कोअर असलेल्या ग्राहकांना बँका कमी व्याजदरात कर्ज देतात. याद्वारेही तुम्ही तुमच्या कर्जाचा व्याजतर कमी करु सकता.

Home loan | Saam TV

खराब ATMमुळे बनला करोडपती! 10 हजारांऐवजी मिळाले 9 कोटी

ATM | Saam TV