ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलांना अंगठा चोखण्याची सवय नैसर्गिक असते.
मुलांची ही सवय लहानपणी काही वाटत नाही, मात्र बाळ जसे मोठे होते तशी ती सोडवावी.
लहान मुलांची अंगठा चोखण्याची सवय भूक लागल्याचे संकेत देते. यामुळे त्यांना खायला द्या
तर काहीवेळा मुले तणावात असल्याने अंगठा चोखतात यामुळे त्यांना एकटे सोडू नका.
मूल ज्यावेळेस अंगठा चोखत असेल त्यावेळेस नकळत त्याचे लक्ष दुसरीकडे वळवावे.
मुलांशी गप्पा मारणे, त्यांना यावेळेस व्यस्त ठेवावे.
अंगठा चोखणाऱ्या मुलांना ओरडू नये, रागावू नये असे केल्याने तणाव दूर करण्यासाठी आणखीन अंगठा चोखू लागतात.
मूल चिंतेत असल्याने असे करत असेल तर त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा.