Sakshi Sunil Jadhav
आयलाइनर डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्याचं महत्त्वाचं साधन आहे. पण अनेक जणींना आयलाइनर लावताना हात थरथरणे, रेषा वाकडी जाणे किंवा दोन्ही डोळ्यांवर समान न बसणे अशी अडचण येते. मग पुढच्या स्टेप्स करा फॉलो करा.
आयलाइनर लावण्यापूर्वी डोळ्यांचा भाग स्वच्छ व कोरडा ठेवा, जेणेकरून लायनर नीट बसेल.
प्रायमर लावल्याने लायनर पसरत नाही आणि जास्त वेळ टिकतो.
नवशिक्यांसाठी पेन किंवा जेल लायनर सोपा असतो, तर एक्स्पर्ट्स लिक्विड लायनर वापरू शकतात.
एकाच वेळी पूर्ण रेषा ओढण्याऐवजी लहान स्ट्रोक वापरल्यास लायनर नीट बसतो.
आधी मधला भाग भरा, नंतर आतील आणि बाहेरील कोपरा पूर्ण करा.
विंग लुकसाठी खालच्या पापणीच्या शेवटच्या रेषेचा अंदाज घेऊन हलकी रेषा काढा.
थोडी चूक झाली तर कॉटन बड आणि कन्सीलरच्या मदतीने ती व्यवस्थित करा.
मस्कारा लावल्यानंतर आयलाइनर जास्त उठून दिसतं आणि डोळे मोठे भासतात. याने लायनर पसरत नाही आणि जास्त वेळ टिकतं.