Surabhi Jayashree Jagdish
आपण अनेकदा शरीराची नियमित तपासणी करतो. पण डोळ्यांकडे मात्र योग्य लक्ष देत नाही.
रेटिना हा डोळ्यांचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तो डोळ्यात येणारा प्रकाश मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो.
आता जाणून घेऊया की रेटिनाची तपासणी किती दिवसांनी करणे आवश्यक आहे.
रेटिना तपासणी ही वय आणि आरोग्याच्या स्थितीप्रमाणे दरवर्षी एकदा तरी करणे गरजेचे आहे.
50 वर्षांनंतर रेटिनाशी संबंधित आजार आणि ग्लूकोमाचा धोका वाढू लागतो.
या वयात दर 6 महिन्यांनी रेटिनाची तपासणी करणे फायदेशीर ठरते.
जर डायबिटीज, उच्च रक्तदाब किंवा डोळ्यांच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास असेल, तर दर 6 महिन्यांनी रेटिना तपासणी करणं आवश्यक आहे.
जर तुमच्या डोळ्यांना आधीपासून कोणताही आजार असेल तर दर 3 ते 6 महिन्यांनी नियमित तपासणी करत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.