Surabhi Jayashree Jagdish
एशिया कप 2025 मध्ये भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव केला आणि विजेतेपदावर कब्जा केला आहे.
या स्पर्धेत आपल्या जबरदस्त फलंदाजीने साऱ्यांचं मन जिंकणाऱ्या अभिषेक शर्माला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार मिळाला.
एशिया कपमध्ये अभिषेकने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कारासोबत Haval H9 SUV भेट देण्यात आली आहे.
Haval H9 ही चीनमधील ग्रेट वॉल मोटर (GWM) कंपनीने 2014 मध्ये लॉन्च केलेली फुल-साईज बॉडी-ऑन-फ्रेम SUV आहे.
या SUV चे डिझाइन बॉक्सी आणि मजबूत आहे, ज्यामुळे ती ऑफ-रोडिंगसाठी अतिशय योग्य ठरते. 2024 मध्ये तिच्या दुसऱ्या जनरेशनचे मॉडेल सादर करण्यात आले.
हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. या SUV ची टॉप स्पीड 200 किमी प्रतितास आहे आणि ती सुमारे 9 ते 12 किमी प्रति लिटर इतका मायलेज देते.
Haval H9 ची लांबी 4950 मिमी, रुंदी 1976 मिमी आणि उंची 1930 मिमी आहे. यात 224 मिमी इतके ग्राउंड क्लीयरन्स दिलेले आहे.
Haval H9 मध्ये 14.6 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, 10-स्पीकर साउंड सिस्टम, पॅनोरामिक सनरूफ आणि वायरलेस चार्जिंगची सुविधा आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने, यात 13 लेव्हल-2 अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स (ADAS) देण्यात आल्या आहेत. यात ट्रॅफिक साइन रिकग्निशन, रिअर कोलिजन वॉर्निंग आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग यांचा समावेश आहे.
ग्रेट वॉल मोटर भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. तज्ज्ञांच्या मते, जर ही SUV भारतात लॉन्च केली गेली तर तिची किंमत सुमारे 40 लाख रुपयांच्या आसपास असू शकते.