Manasvi Choudhary
तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजनविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अत्यंत कमी वयात तेजश्रीने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
केवळ अभिनयच नाही तर तेजश्रीच्या सौंदर्याचे देखील चाहते आहेत.
तेजश्रीविषयी जाणून घेण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक असतात.
तेजश्री प्रधानचा जन्म २ जून १९८८ मध्ये मुंबईत झाला आहे.
तेजश्रीने शालेय शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालय डोंबिवली येथून घेतलं आहे.
उच्च शिक्षण तेजश्रीने व्ही. जी. वाझे. कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातून घेतले आहे.